ग्रामपंचायत आलागोंदी

"स्वच्छ गाव, सुंदर गाव – डिजिटल आलागोंदी आपला गाव"

अधिक जाणून घ्या
Alagondi Village

आमचा गाव – आलागोंदी

आलागोंदी हे महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नागपूर ग्रामीण तालुक्यात वसलेले एक गाव आहे. हे गाव उपजिल्हाधिकारी कार्यालय (नागपूर तहसील) पासून आणि जिल्हा मुख्यालय नागपूरपासून सुमारे ४५ किमी अंतरावर आहे. सन १९६२ नुसार, आलागोंदी हे स्वतंत्र ग्रामपंचायत असलेले गाव आहे.

आलागोंदी गावाने नागपूर प्रदेशात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. पुढील विभागांमध्ये लोकसंख्या, साक्षरता, कुटुंबसंख्या, बालसंख्या, जातिविषयक माहिती, पिनकोड, स्थानिक स्वराज्य, शेजारील गावे आणि त्याबद्दल माहिती दिली आहे.


१) ग्राम पंचायतची मूलभूत माहिती

ग्रामपंचायत नाव : आलागोंदी

समाविष्ट गावे : आलागोंदी – टेंभरी – चिमनाझरी

LGD कोड : 180423

स्थापना वर्ष : 1962

एकूण लोकसंख्या : 1131

एकूण कुटुंबे : 285

BPL कुटुंबे : आलागोंदी 132, टेंभरी 97, चिमनाझरी 56

बचत गट : 17 गट (एकूण 209 महिला सहभाग)

Email : alagondigp@gmail.com

मुख्य पदाधिकारी

सरपंच : सौ. शालिनी गजानन भुते

आमच्या सेवा

ग्रामपंचायतीच्या प्रमुख उपलब्धी व कार्य

A) सुशासनयुक्त पंचायत (Good Governance – 16 गुण)

लोकसहभाग व प्रशासकीय सुधारणा

नागरिकांना ऑनलाइन सुविधा उपलब्ध, सर्वे फॉर्म प्रदर्शित, महिला सभा, युवक सभा, बोर्ड सभा नियमित.

तक्रार नोंदणी व पारदर्शकता

तक्रार पेटी उपलब्ध, नोंदी व्यवस्थित ठेवण्याची प्रक्रिया सुरू.

CCTV व सुरक्षा व्यवस्था

गावातील सुरक्षा व्यवस्था सुधारलेली. आयुष्मान भारत कार्ड वितरण प्रगती.

B) वित्तीय सक्षम – कर, महसूल, लोकसहभाग (10 गुण)

कर व पाणीपट्टी QR/Online

घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यासाठी QR/Online प्रणाली लागू.

महसूल वाढ

गावांतर्गत महसूल (OSR) वाढविण्याकरिता – गाळे भाडे, मोबाईल टॉवर, जाहिरात फलक, पाणीपट्टी सुधारणा सुरू.

नागरिक सहभाग

लोकसहभागातून महसूल वाढीस चालना.

C) जलसंधारण – स्वच्छ – हिरित ग्राम (19 गुण)

पाणीपुरवठा सुविधा

FHTC नळजोडणी, पावसाचे पाणी साठवण, बोअरवेल पुनर्भरण, नालेसफाई व कचरा व्यवस्थापन प्रगती.

स्वच्छता मोहिम

प्लास्टिक बंदी, कंपोस्ट निर्माण, कचरा वर्गीकरण, झाडांच्या देखभाल उपक्रम.

पाणी गुणवत्ता

1 स्रोत = 1 चाचणी उपक्रम.

D) शासकीय योजना व प्रकल्प एकत्रिकरण (6 गुण)

शोषखड्डे, नालेसफाई, वृक्ष लागवड, घनकचरा व्यवस्थापन, मनरेगा कामे, जलसंवर्धन कामे प्रभावीरीत्या राबविली.

E) गावातील संस्था सक्षमीकरण (16 गुण)

शाळा व शिक्षण

३ प्राथमिक शाळा, मुलांना मूलभूत सुविधा उपलब्ध.

आरोग्य सुविधा

आरोग्य उपकेंद्र, आशा सेविका सक्रिय.

अंगणवाडी

३ अंगणवाडी – स्वच्छ शौचालय, पोषण सुविधा उत्तम.

F) उपजीविका विकास व सामाजिक न्याय (23 गुण)

महिला बचत गट कार्यरत – 209 महिलांचा सहभाग. लघुउद्योग, उत्पादन-खरेदी, विक्री उपक्रम, प्रशिक्षण आणि सामाजिक योजनांचा लाभ.

G) नवोन्मेष व प्रशासन (5 गुण)

सौर ऊर्जा प्रकल्प, डिजिटल ग्राम प्रशासन, ERP सॉफ्टवेअर, स्मार्ट सेवा वितरण प्रयत्न.

H) पायाभूत सुविधा स्थिती

पाणीपुरवठा – आलागोंदी: 1 विहीर, 1 हॅण्डपंप • टेंभी: हॅण्डपंप
स्वच्छता – आलागोंदी 477 शौचालये • चिमनाजरी 210 • टेंभी 394

I) शाळा (३ गावे)

तिन्ही गावांमध्ये मुले-मुलींसाठी स्वतंत्र शौचालये आवश्यक.

४) अभियानातील ग्रामपंचायतीची ताकद

सुशासन, पाणीपुरवठा, स्वच्छता, महिला बचत गट, मनरेगा, ERP, पर्यावरण संवर्धन व कोविड काळातील उत्तम व्यवस्थापन.

५) निष्कर्ष

ग्रामपंचायत आलागोंदी ही सुशासन, आर्थिक सहभाग, महिला सक्षमीकरण, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धन या क्षेत्रात आदर्शरूप आहे.

भविष्यातील दिशा :

स्मार्ट ग्राम प्रकल्प, डिजिटल प्रशासन, कचरा प्रक्रिया केंद्र, स्मार्ट वॉटर मीटरिंग.

Village Image Left

📽 ग्रामपंचायत विकास व्हिडिओ

Village Image Right

कर भरण्यासाठी QR कोड

खालील QR कोड स्कॅन करून ग्रामपंचायत कर भरणा करा

Property Tax QR Code
मालमत्ता कर
Water Tax QR Code
पाणी कर

🌿 आमची ग्रामपंचायत टीम

गावाच्या प्रगतीसाठी एकत्र काम करणारी जबाबदार नेतृत्व टीम

सौ. शालिनी गजानन भुते

सरपंच

श्री. रोहित अशोक घोडाम

उपसरपंच

श्री. जी. एस. राऊत

ग्रामसेवक / सचिव

🌱 माझी वसुंधरा अभियान

“पर्यावरणाचे संवर्धन – आपली जबाबदारी, आपला संकल्प!”

हरित उपक्रम

गावात वृक्षारोपण मोहीम राबवून पर्यावरण पूरक वातावरण निर्माण करण्यात आले आहे.

पाणी संवर्धन

जलसंधारण, पावसाचे पाणी साठवणे आणि विहिरींचे पुनर्भरण या माध्यमातून जलस्तर वाढविण्याचे प्रयत्न.

घनकचरा व्यवस्थापन

कचरा वर्गीकरण, कंपोस्ट खत निर्मिती आणि स्वच्छ गाव या मोहिमेला गावकऱ्यांचा सक्रिय सहभाग.